
दापोली तालुक्यातील रोवले उंबरशेत येथून मांदिवलीकडे जाणाऱ्या मार्गावर बॉक्साइटची वाहतूक करणाऱ्या डंपरलाअपघात
दापोली तालुक्यातील रोवले उंबरशेत येथून मांदिवलीकडे जाणाऱ्या मार्गावर बॉक्साइटची वाहतूक करणाऱ्या डंपरला अपघात झाला गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. सातत्याने होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. रोवले उंबरशेत परिसरातून बॉक्साइटचे उत्खनन करून ते मांदिवलीकडे नेले जात असताना, भररस्त्यात डंपर उलटल्याची घटना घडली. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो रस्ता अत्यंत मोकळा आणि सरळ आहे.
अशा स्थितीत डंपर उलटणे अनाकलनीय असून, केवळ अतिवेग आणि क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या मालामुळेच चालकाचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या मार्गावरून दररोज अनेक ओव्हरलोड डंपर भरधाव वेगाने धावत असतात, ज्यामुळे इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे.




