
घोडबंदर घाटात भीषण अपघात, १४ वाहनांची एकमेकांना धडक_____*
ठाण्याची सकाळ शुक्रवारी एका भीषण अपघात वाराची ठरली. घोडबंदर येथील गायमुख घाटात एका अपघातामध्ये १४ वाहनांची एकमेकांना धडक बसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अपघातात काही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल असून अपघाताचे कारण जाणून घेत आहेत. पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी चार जणांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तर काही जण स्वत:हून वेगवेगळ्या रुग्णलयात दाखल झाले. त्यामुळे जखमी व्यक्तींची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अपघतामुळे गायमुख घात ते वसई खाडी पूलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
गरज नसल्यास वाहन चालकांनी काही वेळासाठी घोडबंदरचा प्रवास टाळावा असे आवाहन पोलीस करत आहेत.
घोडबंदर मार्गावरून हजारो जड-अवजड वाहने पालघर, गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. मिरा भाईंदरहून ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने किंवा ठाण्याहून तेथे वसई-विरार, मिरा भाईंदर,बोरिवली, पालघरच्या दिशेने हजारो हलकी वाहने वाहतुक करतात. या मार्गावर अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. शुक्रवारी सकाळी या मार्गावर १४ वाहनांची एकमेकांना धडक बसली आहे. या अपघातात अनेकजण किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती पोलीस, वाहतुक शाखा, आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चार जखमींना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तर काही जण स्वत:हून रुग्णलायामध्ये दाखल झाले. त्यामुळे जखमींची नेमकी संख्या कळू शकली नाही.
घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने अवजड वाहन वाहतुक करत होते. त्याचवेळी काही हलकी वाहने या मार्गावरून विरुद्ध दिशेने वाहतुक करत होते. अचानक वाहनांचे नियंत्रण सुटल्याने ही वाहने एकमेकांना आदळली. अपघात ग्रस्त वाहनांमध्ये काही रिक्षा, चार चाकी वाहने, टेम्पो यासारख्या वाहनांचा सामावेश आहे. यातील काही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
*




