चिपळूण शहरातील गांधारेश्वर येथील वाशिष्ठी नदीपात्रात व्यावसायिकाचा मृतदेह सापडला


चिपळूण शहरातील गांधारेश्वर येथील वाशिष्ठी नदीपात्रात सोमवारी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून तो पेढांबे येथील बेपत्ता व्यापारी विलास महादेव चव्हाण (५०) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. चव्हाण हे २ जानेवारीपासून बेपत्ता होते. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. असे असताना सोमवारी दुपारी गांधारेश्वर येथील वाशिष्ठी नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याची घटना घडली होती. याची माहिती पोलिसाना मिळताच त्यानुसार पो.नि. मेंगडे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा मृतदेह पाण्याबाहेर काढून तो विच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात नेण्यात आला. मृतदेहाची ओळख पटण्यासाठी पोलिसानी प्रयत्न सुरू केला. अखेर हा मृतदेह चव्हाण यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button