वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे


रत्नागिरी, दि. 8 ):- वाहन चालकांनी वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या अंमलबजावणी पथकामार्फत नियमितपणे वाहनांची तपासणी केली जाते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात ख्रिसमस व नवीन वर्ष या सुट्टयांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक येतात. सुरक्षिततेसाठी या दरम्यान मद्यपान करुन / दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनांविरुध्द विशेष तपासणी दरम्यान मद्यपान करून वाहन चालविणा-या दोषी वाहनांवर व वाहन चालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. उप प्रादशिक परिवहन कार्यालयामार्फत 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत एकूण 255 वाहने तपासण्यात आली त्यामध्ये 11 वाहने दोषी आढळून आली व 10 हजार 500 रुपये इतका दंड वसूल केलेला आहे. सदर वाहन चालकांची अनुज्ञप्ती 180 दिवसांसाठी निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित आहे. तपासणी दरम्यान दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाते. वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीकोनातून सदर तपासणी मोहीम यापुढेही चालू राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button