बाबरशेख क्रीडा मंडळ, हातिस क्रिकेट स्पर्धेचे ४९ वर्ष संपन्न.

मानाच्या चषकाचा मानकरी ठरला हापूस ऍग्रो पावस संघ…



स्पर्धा दिनांक २८ डिसेंबर रोजी सुरू होऊन ४ जानेवारी रोजी अंतिम सामना हापूस ऍग्रो आणि श्रीधा श्रीनय नाचणे संघा दरम्यान झाला, यात प्रथम फलंदाजी करत नाचणे संघाने ९ गडी बाद ४२ धावा जमवल्या.. हापूस संघाच्या सलामीच्या जोडीने प्रणव आणि रणजीत फराटे यांनी नाबाद खेळी करत लक्ष अवघ्या ४.३ षटकांत पूर्ण करून एकतर्फी सामना जिंकला…
या स्पर्धेमध्ये एकूण ४६ संघानी सहभाग नोंदवला होता.. आयकॉन खेळाडू ही विशेष संकल्पना असल्यामुळे टेनिस क्रिकेट मधील दिग्गज खेळाडू या स्पर्धेचा हिस्सा बनून गेले.
स्पर्धेच्या अंतिम दिवसाच्या बक्षिस वितरणा वेळी हातिस मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच विशेष उपस्थिती सरपंच श्री. अशोक नागवेकर, श्री. दादा दळी, श्री. महेंद्र झापडेकर, श्री. विजय साळवी, हा. ग्रा. वि. मं. अध्यक्ष दिलीप नागवेकर, माझी अध्यक्ष विजय(बबनजी) नागवेकर, राजेंद्र नागवेकर, तुषार नागवेकर, नरेश विलणकर, पो. पा. संतोष नागवेकर आणि क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष केतन किर उपस्थित होते. विजेत्या पावस संघास मानाचा चषक आणि रोख रक्कम ४९०४९/- तसेच उपविजेत्या नाचणे संघास मानाचा चषक आणि रोख रक्कम २५०४९/- देऊन गौरवण्यात आले.
अंतिम सामन्याचा सामनावीर अहमद नाखवा ठरला. स्टायलिश player of the tournament रणजीत फराटे. सिक्सर किंग हा किताब रोहित भालेराव, उत्कृष्ट गोलंदाज निखिल सारंग, उत्कृष्ट या संपूर्ण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अक्षय सावंत ची निवड करण्यात आली. या क्रिकेट स्पर्धेचा मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज प्रणय मुरकर ठरला… क्रिकेट स्पर्धा वर्ष ४९ चा सिल्वर बॉय किताब अरफान नाखवा यांना देण्यात आला.. या स्पर्धेदरम्यान खूप हातांनी मदत करून स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाची साथ दिली.. DS sport, युवराज फिटनेस, युवा स्पोर्ट्स, सिद्धिविनायक स्पोर्ट्स, संदेश वायंगणकर मित्रमंडळ, रत्नागिरी लाइव्ह यांनीही स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले..

उपेंद्र अरविंद नागवेकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button