मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबई दिशेने जाणारा पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी


मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबई दिशेने जाणारा पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्याने एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.कंटेनर चालक राम आचल मिंद (रा. उत्तर प्रदेश) हा आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक एमएच ४३ जीई २२४४ घेऊन लोटे ते भिवंडी-वाडा असा प्रवास करत होता.

कशेडी घाटात पोलादपूरजवळ चोळई गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला. या अपघातात कंटेनरमधील पेप्सीच्या बाटल्या महामार्गावर सर्वत्र अस्ताव्यस्त पसरल्या असून कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने एक लेन पूर्णपणे बंद झाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button