बँकेने जप्त केलेल्या घरात अनधिकृत प्रवेश, तरुणावर गुन्हा


कर्जाचे हप्ते थकल्याने बैंक ऑफ इंडिया देवरुख शाखेने ताबा मिळवलेल्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करत ताबा घेतल्याप्रकरणी मुंबई मालाड येथील एका तरुणावर मंगळवारी देवरुख पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश शिरीष पवार (३५) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलीस बँकेचे मुख्य प्रबंधक राजेशकुमार रामबदनसिंह यांनी देवरुख पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पवार याने बैंक ऑफ इंडिया शाखा देवरुख मधून १८ लाख २५ हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जाकरीता प्रथमेश याने सर्वे क्र. ४४५, हिस्सा क्र. १ देवरुख नगरपंचायत घर ही मिळकत बँकेत तारण ठेवली होती. मात्र पवार याने कर्जाची परतफेड न केल्याने ३१ मार्च २०२१ रोजी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार खाते थकित झालेले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार १२ एप्रिल २०२४ रोजी बँकेने घराचा ताबा घेतला होता. मिळकतीत दरवाजाला लावण्यात आलेल्या कुलपाचे सील प्रथमेश याने तोडून बेकायदेशीररित्या घरात प्रवेश करून घराचा ताबा घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. प्रथमेश पवार याच्यावर मंगळवारी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button