रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेची रो-रो सेवा दोन तासांहून अधिक काळ रखडली, रो रो मधील एका ट्रक मधील माल एका बाजूला झाल्याने घ्यावा लागला निर्णय


रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेची रो-रो सेवा दोन तासांहून अधिक काळ रखडल्याची घटना घडली आहे
शुक्रवारी दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास खेड रेल्वे स्थानकात रो-रो सेवा दोन तासांहून अधिक काळ थांबवावी लागली. कोलाड येथून मडगावकडे मालवाहू ट्रक घेऊन जाणारी रो-रो ट्रेन खेड स्थानकात दाखल झाल्यानंतर थांबवण्यात आले रोरो ट्रेनमधील एक ट्रक मधील माल सरकल्याचे निदर्शनास आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. ट्रक कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रसंगावधान राखत तत्काळ सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या.

घटनास्थळी ट्रकमधील माल पुन्हा व्यवस्थित ठेवण्याचे काम सुरू असून, सेफ्टी बेल्ट लावून ट्रक सुरक्षित करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या प्रवासी किंवा इतर रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही यामुळे यापुढे आता रो रो मधून ट्रक माल देताना सुरक्षितेचे काळजी घ्यावी लागणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button