कोकणातील प्रसिद्ध खातू मसाले उद्योगाचा ४९ वा वर्धापन दिन उत्साहात


पर्यटकांसह कोकणवासियांचे जिभेचे चोचले पुरविणार्‍या कोकणातील गुहागरचे सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योगाचा ४९ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उद्योगाच्या यशस्वीतेसाठी काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा पारितोषिके देवून गौरव करण्यात आला.
या वर्धापनदिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खातू मसालेचे मुंबई कार्यालयाचे प्रतिनिधी यशस्वी उद्योजक गिरीश काशीनाथ कोळवणकर व कॅडबरी कंपनीतील निवृत्त अधिकारी सुरेश अनंत देवळेकर, विजय जुवळी उपस्थित होते. गुहागर सारख्या मोठ्या गावांमध्ये १९७६ साली शून्यातून विश्‍व उभारत यशाची सर्वात उंच शिखरे गाठून खातू मसालेचे सर्वेसर्वा उद्योगभूषण डॉ. शाळीग्राम खातू यांनी खातू मसाले हा एकमेव ब्रँड निर्माण केला. खातू मसालेची उत्पादने मुंबई बरोबरच आता सातासमुद्रापार म्हणजेच इंग्लंड, दुबई यासारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी पोहोचली आहेत. शिवाय देशातील विविध मॉल, डी मार्ट, अपना बाजार, बिगबाजार व ऑनलाईन मार्केटींग करणार्‍या अमेझॉनवरही उत्पादने उपलब्ध आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button