
पर्यटनासाठी मुंबई येथून आलेल्या पर्यटक महिलेचा मृत्यू
दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये पर्यटनासाठी मुंबई येथून आलेल्या नीता सुबोध निंबकर (५१) या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता सुबोध निंबकर (रा. लक्ष्मीबाई चाळ ठाकूरद्वार मुंबई) या पती सुबोध निंबकर, मुलगा नहुश व मुलगी सृष्टी यांच्यासोबत मुरुड समुद्रकिनारी फिरायला आल्या होत्या. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मुरुड बीचवरील बनाना राईडसाठी त्या समुद्राच्या पाण्यात गेल्या. राईड मारून परत असताना त्यांना जोरात धाप लागून दम्याचा त्रास सुरू झाला व काही वेळातच त्या बेशुद्ध पडल्या. त्यांचे पती सुबोध निंबकर यांनी औषध उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे त्यांना दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मृत झाल्याचे घोषित केले. दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता पवार करीत आहेत.www.konkantoday.com




