
मुंबईत भांडुप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळबेस्ट बसने 13 जणांना उडवलं, चौघांचा जागीच मृत्यू,
मुंबईत भांडुप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्टेशन बस डेपोजवळ सोमवारी रात्री मोठा अपघात झाला. बेस्ट इलेक्ट्रिक बस क्रमांक ६०६ ने १३ जणांना उडवलं आहे. या अपघातात चार जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे.तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांसह एका पुरूषाचा समावेश आहे. या अपघातात ८ पुरुष आणि एका महिलेसह नऊ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास लोक कामावरून घरी परतत असताना हा अपघात झाला. भांडुप स्टेशनच्या बाहेर, फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांची बाजारपेठ असलेली मोठी गर्दी होती. स्टेशनजवळ अचानक बेस्ट इलेक्ट्रिक बस वळत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि सुमारे १३ जणांना धडकली. काही जण बसखाली चिरडले गेले, ज्यामुळे जागीच चार जणांचा मृत्यू झाला.बसच्या धडकेने लोखंडी विजेचा खांबही वाकला आहे. यावरून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकतो.
पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केली जात आहे




