शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली


शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांमधील ही त्यांची तिसरी भेट आहे. शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची महत्वाची बैठक झाली. २० मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जागा वाटपाच्या तिढ्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. चर्चा झाल्यानंतर शिवतीर्थवरचा निरोप घेऊन संजय राऊत मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले.ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसे- शिवसेना युतीची अधिकृत घोषणा उद्या होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. पण जागावाटपाबाबत पेच निर्माण झाला होता तो पेच आजच्या दोन्ही पक्षांच्या बैठकीमध्ये दूर करण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आज संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.ऊत निरोप घेऊन मातोश्रीवर गेले. त्यानंतर साडेबारा वाजता मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये संजय राऊत राज ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेची माहिती देतील. त्यानंतर उद्या युतीची घोषणा करण्यासाठी कशापद्धतीचे नियोजन असले पाहिले याबाबत देखील बैठकीत चर्चा होईल.मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीश सरदेसाई हे देखील या बैठकीत उपस्थित आहेत. त्यामुळे ज्या काही चार ते पाच जागांबाबत तिढा निर्माण झाला आहे त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button