रायपाटणग्रामीण रुग्णालया नजीक असलेल्या गणेश कृपा हॉटेलला अचानक आग लागून संपूर्ण हॉटेल भास्मसात


राजापूर तालुक्यातील रायपाटण
ग्रामीण रुग्णालया नजीक असलेल्या गणेश कृपा हॉटेलला अचानक आग लागून संपूर्ण हॉटेल भास्मसात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५.३०वा.च्या दरम्यान घडली. हॉटेलला लागलेली आग शॉर्ट सर्किटने
लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. लागलेली आग विजविण्यासाठी राजापूर नगर परिषदेच्या अग्नी शामक दलाला पाचारण करण्यात आले .दरम्यान अग्नी शामक दलाची गाडी रात्री घटनास्थळी दाखल झाली व लागलेली आग विझविण्यात आली. मात्र आगीत गोडेकर यांचे सर्व साहित्य भस्मसात झाले होते.
सदानंद महादेव गोडेकर हे हॉटेल असून ते सायंकाळी काही निमित्त पाचलला गेले होते. नेमकी त्या दरम्यान आग लागली होती. हॉटेल बंद असल्याने कुणाच्या लक्षात आले नव्हते.
मात्र हॉटेल मालक गोडेकर पाचल येथून परत आले असता त्यांना हॉटेलमधून धूर येत असल्याचे दिसला आणि त्यांनी तात्काळ हॉटेलचा दरवाजा उघडला असता आतमध्ये मोठी आग लागल्याचे आढळून आले. दरम्यान आजूबाजूची मंडळी देखील धावून आली. आग विझवायला सुरवात झाली. मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीत गोडेकर यांचे सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी आणलेले किराणा सामान, औषधे, अंथरूण, कपडे व अन्य साहित्य यांचा समावेश होता. ते त्याच हॉटेल मधील छोट्या जागेत रहात होते.
मदतीसाठी धावून आलेल्या ग्रामस्थांनी हॉटेल मधील एक भरलेला आणि दोन रिकामी सिलेंडर तात्काळ बाहेर काढले. त्यामुळे मोठा धोका टळला. आगीत नेमके किती नुकसान झाले ते समजू शकले नाही. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान आग लागल्याचे सांगण्यात आले. रायपाटण पोलीस दूरक्षेत्राला घटनेची खबर मिळताच
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील पोलीस कर्मचारी रामदास पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button