नर्सरीसाठी ३, ज्युनियर केजीसाठी ४, सिनियर केजीसाठी ५ वर्षे वयाची अट, शाळा प्रवेशाचे वय आता एकसमान; राज्य सरकारचा नवा शासन निर्णय


राज्यातील पूर्वप्राथमिक आणि इयत्ता पहिलीच्या शाळा प्रवेशासाठी राज्य सरकारने किमान वयाचे नवे निकष निश्चित केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार हे निकष शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहेत.त्यानुसार नर्सरीसाठी तीन वर्षे, ज्युनियर केजीसाठी चार वर्षे, सिनियर केजीसाठी पाच वर्षे आणि इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक राहणार आहे.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत यापूर्वी शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादेबाबत तरतुदी करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्य मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अशा विविध शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी वयाची गणना वेगवेगळ्या पद्धतीने केली जात होती. तसेच पूर्वप्राथमिक वर्गांच्या प्रवेशासाठी वयाची एकसमान अट नव्हती. या पार्श्वभूमीवरमी शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button