
राज आणि उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद!
Maharashtra Breaking News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे.
या पत्रकार परिषदेतून मोर्चाची रुपरेषा आणि इतर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. यासह राज्यात सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. विविध भागातून दुष्काळाची भीषण परिस्थिती समोर येऊ लागली आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा यासाठी शेतकरी आणि सामान्य नागरिकांना समस्या भेडसावू लागली आहे.
दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधीपक्ष रस्त्यावर उतरले असून, कुमार यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे. यासह राज्यातील राजकारण, गुन्हे, कला, क्रीडा, संस्कृती, दुष्काळ परिस्थिती यासह विविध महत्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.




