IIT बॉम्बेबाहेर काँग्रेसची निदर्शने; काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, NSIU च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

मुंबई : आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या कथित आत्महत्येप्रकरणी गुरुवारी संस्थेच्या पवई कॅम्पसबाहेर आंदोलन करण्यासाठी जमलेल्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

वाकोडेच्या कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत होते.

मुंबई काँग्रेसने साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी आयआयटी पवईच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली, धक्काबुकी केली व त्यांना ताब्यात घेतले, त्यानंतर वर्षा गायकवाड, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, जिल्हा अध्यक्ष केतन शाह, भावना जैन, अर्शद आझमी, राजपती यादव, अवनीश सिंग, सुभाष भालेराव, विक्रम सिंग, प्रदूम यादव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन केले व पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “आयआयटीसा रख्या संस्थेतही आरएसएसचा शिरकाव झाला असून जात व धर्माचा शैक्षणिक संस्थांमध्ये शिरकाव होणे अत्यंत चिंताजनक आहे. साहिल वाकोडे याने अत्याचाराला कंटाळून जीवन संपवले, अशा घटना या संस्थेत होत आहेत हेच गंभीर आहे. यापूर्वीही आयआयटी बॉम्बेमध्ये काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत पण संस्थेने यातून काहीच धडा घेतला नाही. साहिलला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी काँग्रेस हा लढत आहे व साहिलला न्याय मिळेपर्यत आम्ही गप्प बसणार नाही.”

Student suicide:

Police detain Congress MP Varsha Gaikwad, other party workers protesting outside IIT Bombay campus. pic.twitter.com/eV9ETzDNey

— News Arena India (@NewsArenaIndia) September 24, 2026

साहीलच्या आयफोन अन् लॅपटॉपची न्यायवैद्यक तपासणी

आयआयटी मुंबईचा २२ वर्षीय विद्यार्थी साहील वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणात त्याचा लॉक आयफोन आणि अॅपल लॅपटॉप गुन्हे शाखेने फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे पाठवला आहे. दोन ते तीन दिवसांत उपकरणे अनलॉक होऊन महत्त्वाचा डेटा मिळण्याची पोलिसांना अपेक्षा आहे. १८ सप्टेंबर रोजी परीक्षेत मोबाईल वापरताना पकडल्यानंतर साहीलने मैत्रिणीला फोन करून चूक झाल्याची कबुली दिली होती व त्यानंतर आत्महत्या केली.

पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात

काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे एनएसयूआयचे सदस्य गुरुवारी पवई कॅम्पसबाहेर आंदोलनासाठी जमले होते. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी काही काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर वर्षा गायकवाड तेथे पोहोचल्यानंतर त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. भीम आर्मी पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही आयआयची बॉम्बेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केले, पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. त्यामुळे आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पसला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button