
संगमेश्वर येथेबसवर दगडफेकीच्या घटनेने संगमेश्वर परिसरात उडाली खळबळ
देवरूख आगाराची देवरूख-करजुवे ही बस संगमेश्वर बस स्थानकातून आज शनिवारी सकाळी ९.१५ वा. सुटल्यावर घडली घटना
संगमेश्वर बस स्थानकातून बस सुटल्यावर ब्रीजखालून वळत असताना एका व्यक्तीने पाठीमागून धावत्या बसवर दगड भिरकावला
या घटनेत बसच्या मागील बाजूची काच संपूर्णपणे फुटली आहे
बसवर कोणीतरी दगड मारल्याचा आवाज येताच चालकाने तात्काळ बस थांबवली व खाली उतरून बसवर दगड मारणाऱ्या व्यक्तीला संगमेश्वर बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षात आणले
या घटनेची माहिती संगमेश्वर पोलीसांना देण्यात आल्यावर पोलीस संगमेश्वर बसस्थानकात दाखल झाले
बसवर दगडफेकीच्या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे




