
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कोकण दौऱ्यावर
▪️बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सावंतवाडी नगर परिषद नाट्यगृह येथे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर त्याच दिवशी दुपारी 3 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी येथे भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा दक्षिण कार्यकारिणी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी सायंकाळी 6 वाजता रत्नागिरी उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या उपस्थितीत चिपळूण येथील शिक्षक पतपेढी हॉल येथे उत्तर जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता रायगड दक्षिण भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत अलिबाग कुरूळ येथील क्षत्रैक्य समाज हॉल येथे रायगड दक्षिण जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारी 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत पनवेल येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे रायगड उत्तर जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदिप लेले यांच्या उपस्थितीत ठाणे शहर जिल्हा कार्यकारिणी बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत




