
भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी जागरूक व्हाद्या १०६४ ला साथ…करूया भ्रष्टाचारावर मात..!

लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा आहे. लाच कोणी मागत असेल किंवा देत असेल तर अशा दोघांवरही कारवाई करण्यासाठी लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर सुजाण नागरिक म्हणून लाचेसंबधी तक्रार १०६४ या टोल फ्री क्रमांकावर, ७०३८३९१०६४ या व्हाटस ॲप क्रमांकावर करून भ्रष्टाचारावर मात करूया, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.

शासकीय नोकरांनी लाचेची मागणी, लाच स्वीकारणे,शासकीय नोकरास लाच देणे, अपसंपदा प्राप्त करणे व पदाचा दुरूपयोग करून भ्रष्टाचार करणे, शासकीय नोकराने भ्रष्टाचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वत:च्या नावे किंवा त्याच्यावतीने कोणत्याही व्यक्तीकडे, पद धारण करण्याच्या कालावधीत कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देवू शकणार नाही, अशा आर्थिक साधन-संपत्तीचा किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमवणे. अशा गुन्ह्याचा तपास एसीबीमार्फत होतो. लोकसेवक किंवा खासगी इसम. जो लोकसेवकाच्यावतीने लाचेची मागणी करेल व स्वीकारेल. ज्या लोकसेवकाकडे तक्रारदाराचे कायदेशीर काम प्रलंबित आहे अशा लोकसेवकाविरुध्द तसेच त्याच्याकडे काम प्रलंबित नसतानाही स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा दुरूपयोग करणाऱ्या लोकसेवकाविरूध्द तक्रार देता येते.
सापळा कारवाई म्हणजे, लाचेची मागणी लाच स्वीकारताना व लाच देताना एसीबीमार्फत सरकारी नोकरास रंगेहात पकडणे. सापळा रक्कम तक्रारदाराकडून पुरवली जाते. ही रक्कम त्याला परत मिळते. सरकारी नोकराकडून कायदेशीर काम करण्याकरिता शासकीय फी व्यतिरिक्त इतर तसेच कायदेशीर काम न करण्याकरिता पैशाची अथवा इतर गोष्टींची मागणी होत असेल अशावेळी लाचेची तक्रार देता येते. सापळा कारवाईत तक्रारदाराचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने त्याला एसीबी कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. तक्रारदाराची ओळख तसेच लाचेचा सापळा ही गुप्त ठेवली जाते.
सापळा कारवाईनंतर आरोपी लोकसेकवकाकडून तक्रारदारास धमकी प्राप्त झाल्यास एसीबीमार्फत आरोपीविरूध्द पुरावे जमा करून त्याचा जामिन रद्द होण्याकरिता न्यायालयास विनंती केली जाते. तक्रार *१०६४ या टोल फ्री क्रमांकाव्दारे *www.acbmaharashtra.gov.in Anti-Corruption Bureau Maharashtra* या फेसबुक पेजवरील lodge व कंप्लेंट सदराखाली करता येते. लेखी अर्ज तसेच लाचेची तक्रार देण्याकरिता तक्रारदाराने स्वत: एसीबी कार्यालयात हजर राहणे गरजेचे आहे. सापळा कारवाईनंतर तक्रारदाराचे प्रलंबित काम एसीबीमार्फत पूर्ण होण्याकरिता पाठपुरावा केला जातो. न्यायालयीन प्रकियेदरम्यान साक्षीकामी हजर राहणे तक्रारदाराला आवश्यक असते.
लोकसेवकाने घटनास्थळीच लाचेची मागणी केली किंवा लाच स्वीकारली, अशा वेळी अशा लाचेच्या घटनांच्या माहितीबाबत मोबाईल, कॅमेरामध्ये, ऑडीओ-व्हिडीओ टिपून तो एसीबीच्या www.acbmaharashtra.net या मोबाईल ॲपवरील कंप्लेंट पॅनलमधून पोस्ट करावी.
चला तर मग ! करूया लाच घेणाऱ्या लोकसेवकांची तक्रार आणि संपवूया भ्रष्टाचार. त्यासाठी लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील मो.क्र.७५८८९४१२४७,टोल फ्री क्रमांक १०६४, ०२३५२-२२२८९३, ७०३८३९१०६४, या व्हाटस अॕप क्रमांकावर संपर्क साधावा.
भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. लाच देण्यास आणि घेण्यास नकार द्या, आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवा. आपली जागरूकता आणि सहभाग यामुळेच आपण एक स्वच्छ आणि न्याय्य महाराष्ट्र घडवू शकतो. आपण सर्व मिळून ‘भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र’ हे स्वप्न प्रत्यक्षात आणूया! – प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी मो.क्र.९४०३४६४१०१




