
आबलोली येथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दमदार कामगीरी
पाच तास अंधाऱ्या रात्रीत मेहनतीने १५ गावे आणली उजेडात


गुहागर तालुक्यातील आबलोली येथील होमाच्या मैदानातील ठिकाणी आबलोली उपकेंद्र येथून निघणारा ११ केव्ही लाईनच्या पोलवर असणारा व्ही क्रॉस आणि वायर तुटली होती. त्यामुळे आबलोली उपकेंद्र येथून निघणारी ११ के व्ही पडवे फिडर लाईनवरील १५ गावे पाच तास अंधारात होती.

यावेळी महावितरण आबलोलीचे शाखा अभियंता सुजय निकम यांचे मार्गदर्शनाखाली महावितरणचे प्रकाश दूत प्रशांत कदम, संजय आग्रे, विशाल भोसले, प्रसाद शिगवण, अनिकेत जाधव, शैलेश वेलुंडे, सागर चव्हाण यांनी अंधाऱ्या रात्री तब्बल पाच तास मेहनत घेऊन ११केव्ही लाईनवरील १५ गावांतील ४५०० ग्राहकांचे घरे उजेडात आणली.
या कामी आबलोली येथील ग्रामस्थांनीही विशेष सहकार्य आणि मदत केली. या सर्वांचे आबलोली गावातून कौतुक करण्यात येत आहे.




