पालकमंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर; ‘जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’ ला उपस्थिती व मार्गदर्शन


*रत्नागिरी, दि. २९ – उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. नियोजित दौरा पुढीलप्रमाणे राहील:

  • सकाळी १० वा.: लांजा येथील सामंत ग्राउंडवर डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थिती.
  • सकाळी ११ वा.: ग्रुप ग्रामपंचायत मावळंगे/नातुंडे येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण व उद्घाटन.
  • सकाळी ११.४५ वा.: गावखडी ग्रामपंचायतीच्या नूतन सभागृहाचा उद्घाटन सोहळा.
  • दुपारी १ वा.: हॉटेल सावंत पॅलेस, रत्नागिरी येथे आयोजित ‘जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’ ला उपस्थिती व मार्गदर्शन.
  • दुपारी १.४५ वा.: साळवी स्टॉप (नाचणे रोड) येथे रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित तर्फे आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती.
  • दुपारी ३ वा.: नारायण गणेश कुलकर्णी विद्या निकेतन सागवे हायस्कूल (ता. राजापूर) येथे आयोजित बॉक्साईट विरोधी संघर्ष मेळाव्यास उपस्थिती.
  • सायंकाळी ५.३० वा.: साळवी स्टॉप ते मारुती मंदिर दरम्यान ‘श्री रत्नागिरीचा राजा’ भव्य आगमन सोहळ्यात सहभाग.
    दौऱ्यानंतर रात्री शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव वेळ असून, रात्री ११.३० वाजता ते रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होतील. सोमवारी (३१ ऑगस्ट) पहाटे ५.४० वाजता त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button