टपाल विभागात ६५ जागांसाठी भरती; ३१ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज सुरू

रत्नागिरी, दि २५ ) – टपाल विभागामध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या (GDS) एकूण ६५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. विविध प्रवर्गांमधून ही पदे भरली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भरतीचे महत्त्वाचे तपशील:

  • पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (GDS)
  • एकूण रिक्त पदे: ६५ जागा (विविध प्रवर्ग)
  • अर्ज भरण्याची सुरुवात: ३१ ऑगस्ट २०२६
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत: २१ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
  • अधिकृत संकेतस्थळ: https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
    पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button