
जन्म आणि नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार, शुल्कात १० पट वाढ
जन्म आणि नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाने जन्म-मृत्यू नोंदणीशी संबंधित विविध सवांच्या शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आकारण्यात येणार शुल्क थेट १० पट वाढविण्यात आले असून, पूर्वी दोन रुपये असलेल्या दाखल्यासाठी आता २० रुपये मोजावे लागणार आहेत.
संगणकीकरण, दप्तर दुरुस्ती, नोंदणी प्रक्रिया आणि प्रशासकीय खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन शुल्कात सुधारणा करण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणीशी संबंधित विविध सेवांसाठी नागरिकांना सुधारित दरानुसार शुल्क भरावे लागणार आहे. ङ्गङ्गजन्म किंवा मृत्यूची नोंद ठरलेल्या मुदतीत करणे आवश्यक असते. मात्र, विहित मुदतीत नोंदणी न झाल्यास विलंब शुल्क आकारले जाते. यापूर्वी विलंबाच्या कालावधीनुसार ५० ते १०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते आता या विलंब शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वेळेत जन्म-मृत्यूची नोंद न करणार्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.




