
सोनम वाकंचुक यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, अखेर ‘मेदान्ता’ रुग्णालयात हलवण्यास परवानगी
बेमुदत उपोषणामुळे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक त्यांच्या प्रकृतीवर सतत वैद्यकीय देखरेख ठेवणे आवश्यक आहे. याबाबत सरकारी आणि खासगी दोन्ही डॉक्टरांचे एकमत झाले आहे, असे स्पष्ट करत दिल्ली उच्च न्यायालयाने आज (दि.२१) त्यांना सफदरजंग रुग्णालयातून ‘मेदान्ता’ रुग्णालयात हलवण्यास मंजुरी दिली.वांगचुक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
यापूर्वी उच्च न्यायालयाने फेटाळली होती मागणी
वांगचुक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावी, अशी मागणी करणारी यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी दाखल केली. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने ही मागणी फेटाळली होती. याला पुन्हा एकदा गीतांजली यांनी आव्हान दिले होते. आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.




