सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ कनगुटकर यांचे अपघाती निधन


मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा जवळील भोके फाटा येथे शनिवारी सायंकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली. गावातील अंतर्गत रस्त्यावरून महामार्गावर येणार्‍या दुचाकीला मोटरसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे भोके गावातील लोकप्रिय सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ कनगुटकर (७२) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटरसायकलस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे.
कनगुटकर हे शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास भोके आंबेकरवाडी या आपल्या मूळ गावातून दुचाकीने हातखंबा मार्गे खड़शी येथील आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाले होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत दोघांनाही तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल करताच वैद्यकीय अधिकार्‍यांनी कनगुटकर यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button