
माजी आमदार डॉ. विनय नातू यानी सिंधुरत्न समृद्ध योजना रत्नागिरी कार्यालयाला दिली भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सिंधुरत्न समृद्ध योजेना रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदावर डॉ. विनय नातू यांची नियुक्ती केली. रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सतत वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न करत असलेले प्रदेशाध्यक्षांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांचे या निवडीकरिता मोलाचे सहकार्य लाभले. निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुरत्न समृद्ध योजना रत्नागिरी कार्यालयाला डॉ. विनय नातू यांनी भेट दिली यावेळी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीफळ वाढवून कार्यालयात प्रवेश करण्यात आला.




