
मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम100% कामकाज पूर्ण करणारा 265-चिपळूण महाराष्ट्रातील पहिला विधानसभा मतदार संघ
रत्नागिरी, ) : भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम SIR 100 टक्के कामकाज पूर्ण करुन 265- चिपळूण विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्रातील पहिला मतदार संघ ठरला आहे, अशी माहिती मतदान नोंदणी अधिकारी 265-चिपळूण विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.
30 जूनपासून केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदार यादीचे पुनरिक्षण करीत आहेत.
265 चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील एकूण 336 मतदान केंद्र समाविष्ट आहेत. मतदारसंघाची एकूण मतदार संख्या 2,71,433 इतकी असून त्यामध्ये स्त्री मतदार 1,38,675 व पुरुष मतदार 1,32,758 इतके आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली व मतदार नोंदणी अधिकारी (265 चिपळूण विधानसभा मतदारसंघ) तथा उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली मतदार यादी पुनरिक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या यशामध्ये अहोरात्र काम करणा-या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचा सिंहाचा वाटा आहे.
SIR प्रक्रियेतील कामकाज
EF डिजिटायझेशन पूर्ण झालेले – 2,45,487 (90.44%),
Uncollectable EF – 25,946 (9.56%),
No Mapping – 7,583 (2.79 %),
हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सहायक मतदार नोंदणी अधिकारी प्रविण लोकरे, संगमेश्वर तहसिलदार अमृता साबळे, अति. सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी उमा घारगे – पाटील, संगमेश्वर गटविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे, मुख्याधिकारी संजय जाधव, देवरुख नगर पंचायत मुख्याधिकारी प्रशांत भोसले, नायब तहसिलदार जी. ए. खामकर, निवासी नायब तह शशिकांत साळुंखे, संगमेश्वर नायब तहसिलदार मिलींद सावंत, नायब तहसिलदार संगमेश्वर सुदेश गोताड यांनी मोलाचे योगदान दिले.
AERO यांचे सहायक म्हणून नियुक्त कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, BLO यांचे सहायक म्हणून ग्राम महसूल अधिकारी, शिक्षक, केंद्रप्रमुख, महसूल सेवक, पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तसेच सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी / ऑपरेटर, संकलन टिम, IT टिम यांच्या मदतीने हे काम पूर्ण होऊ शकले.
8 ऑगस्टपर्यंत पुढीलप्रमाणे होणार कामकाज
अ) BLO स्तरावर – 1 ) Uncollectable EF ची फेरपडताळणी करणे (Reverification)
2) Unmapped मतदारांचे मॅपिंग करण्याचा प्रयत्न करणे.
3) Anomalies दूर करणे,
ब) ERO, AERO स्तरावर डिजिटाइझ झालेल्या EF ची तपासणी करणे.
अशा प्रकारे 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघ हा SIR – मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण पूर्ण करणारा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ ठरला आहे.
000



