काळानुरूप वटपौर्णिमा साजरी करूया


मैत्रिणींनो 29 जूनला वटपोर्णिमा आहे समस्त सुवासिनींच्या अगदी जिव्हाळ्याचा सण. नवपरिणीत नवरीचा या सणाला थाट काही औरच! ठेवणीतल्या साड्या आणि दाग दागिन्यांची पुरेपूर हौस या सणांच्या निमित्ताने पुरवली जाते सर्वत्र एक नवचैतन्य पाहायला मिळतं.
आता आधुनिक काळानुसार आपल्याला काही बदलही पाहायला मिळतात.आपली पत्नी आपल्या उदंड आयुष्यासाठी जर उपवास करत असेल तर आपणही आपल्या पत्नीसाठी का करू नये या उदात्त विचारापोटी काही पतीदेवही वडाला प्रदक्षिणा घालताना दिसतात आपला पिंट्या दादा ही स्वानंदीसाठी वडाला सूत गुंडाळताना दिसणार आहे बरं!(वीण दोघातली तुटेना )असो. किंवा काही पतीराज उपवासही करतात काहीजण उपवास करू नकोस असंही सांगतात मात्र मोठ्या भक्ती भावाने हा वटपौर्णिमेचा सण सर्वत्र साजरा केला जातो हे विशेष!
मैत्रिणींनो ,आपण लागवड केलेली वड आणि उंबर यांची झाडे आता नऊ वर्षांची झालेत मात्र यंदाच आपलं तिसरं वर्ष आपण या विशाल वृक्षांच्या छायेत एकत्र जमतो.गप्पागोष्टी करतो .गाणी म्हणतो .यावर्षी याचबरोबर आपण पिंपळाचे एक रोप त्यांच्या शेजारी लावणार आहोत म्हणजे वड ,पिंपळ आणि औदुंबर अशी ब्रम्हा ,विष्णू आणि महेश यांची तीन रूप आपल्याला एकत्र दिसणार आहेत खरंच आज पर्यावरणाच्या दृष्टीने अशा वृक्षांची लागवड करणे ही काळाची गरज आहे हे लक्षात ठेवून पूजेसाठी वडाची फांदी न आणता प्रत्यक्ष वडाच्या झाडाकडे जा आणि पूजा करा आपल्या परिसरात हा वृक्ष नसेल तर यंदाच त्याची लागवड करा आणि पूजेसाठी जे साहित्य तुम्ही फळ ,ब्लाउज पीस ,सुकामेवा इत्यादी झाडाखाली ठेवता ते पूजेनंतर एखाद्या गरजू व्यक्तीला द्या म्हणजे झाडाखाली ते कुजून जाणार नाहीत.
सोमवार दिनांक 29 रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता आनंदनगर गार्डन, थिबा पॅलेस रोड येथे जरूर या आपला वटवृक्ष आपली वाट पाहत आहे आणि पिंपळाची लागवड ही करायची आहे
श्रद्धा कळंबटे रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button