जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर; खेड नगरपरिषदेचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन


खेड : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर खेड नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहरातील नागरिक व व्यापारी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून खेड शहरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे, औषधे, अन्नधान्य व इतर अत्यावश्यक वस्तूंची तयारी ठेवावी. तसेच नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास तयार राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, असे आवाहन खेड नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button