
शाळांमधील घटती पटसंख्या रोखून विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील घटती पटसंख्या रोखून विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शिक्षण विभागातील वर्ग १च वर्ग २ चे अधिकारी तसेच पर्यवेक्षकीय कर्मचार्यांना जिल्ह्यातील प्रत्येकी एक शाळा दत्तक घ्यावी लागणार आहे. या माध्यमातून शाळांच्या शैक्षणिक गुणवेत्तेत सुधारणा, पालकांचा विश्वास संपादन करणे आणि विद्यार्थ्यांची गळती रोखण्यावर भर दिला जाणार आहे.
गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची घट ल्याचे संख्या लक्षणीयमित्या शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. सरकारी शाळांमधील क १ ही सुविधांचा अभाव तसेच पालकांचा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.www.konkantoday.com




