
राज्यात मुसळधार पाऊस, 24, 25, 26, 27 तारखेला थेट इशारा..
राज्यात मॉन्सून दाखल झाला. जोरदार पाऊस सर्वदूर सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मॉन्सून राज्यात दाखल झाला. दमदार पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.24, 25, 26, 27, 28 पर्यंत राज्यात असाच धो धो पाऊस राहण्याचा अंदाज आहे. अनेक भागात रात्रभर पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर पाऊस होता. अनेक भागात पाणी साचले आहे. कुर्ला, किंग सर्कल आणि सायनमध्ये पाणी साचले. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला. मॉन्सून राज्यभरात पसरला आहे. पुढील 3 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. या पावसामुळे रस्ते जलमय झाले. पुढील दोन ते तीन दिवस अरबी समुद्र, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशच्या दिशेने मॉन्सून पुढे सरकत आहे.




