रत्नागिरी परिमंडलात ३ लाख २१ हजार स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले.


राज्यातील वीज ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख २३ हजार २४७तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९८ हजार ३३० असे एकूण ३ लाख २१ हजार ५७७ स्मार्ट टीओडी मीटर रत्नागिरी परिमंडलामध्ये बसविण्यात आले आहेत. उर्वरित वीज ग्राहकांना स्मार्ट टीओडी मीटर बसवून घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ८९ हजार ४१० लघुदाब ग्राहक, २३९ उच्चदाब ग्राहक, २३ हजार ३५ लघुदाब नवीन विद्युत जोडणी, १४ उच्चदाब नवीन जोडेणी, ३७३ वीज वाहिनी, ८ हजार ६६४ वितरण रोहित्र, १ हजार पुनर्जोडणी, तर २०१ वीज निर्मिती प्रकल्प / केंद्र यांना स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button