
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर मान्सूनपूर्व उपाययोजना करा, महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक दीपाली जाधव यांची सूचना
महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र हातखंबाचे हद्दीतून रत्नागिरी ते आंबाघाट असा मिर्या नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जात असून त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने त्याची पाहणी करुन महामार्गावर ज्याठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्याठिकाणी ते बुजवून घ्यावेत. तसेच ज्याठिकाणी डायव्हर्जन करण्यात आलेले आहे त्याठिकाणी पक्का डांबरी रस्ता करावा. हा रस्ता पूर्णपणे मातीचा असल्याने तो पाऊस सुरु झाल्यानंतर वाहने अडकून पडणार नाहीत, यासाठी आवश्यक उपाययोजना ’संबंधित ठेकेदाराने तात्काळ कराव्यात, अशी सूचना महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक दीपाली जाधव यांनी केली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी जाण्याकरीता गटार निर्मिती करणे आवश्य आहे.




