
रत्नागिरीत अवैध दारूवाल्यांची खैर नाही, प्रशासनाकडून कडक कारवाईचा इशारा
गाव गाडा चालवणार्या आणि शासनाकडून दरमहा मानधन पदरात पाडून घेणार्या गावच्या कारभार्यांनो आता जरा सावधान! तुमच्या गावात जर अवैध दारूची भट्टी धगधगत असेल आणि तुम्ही त्याकडे डोळेझाक करीत असाल, तर थेट तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने आता कंबर कसली असून, यामध्ये हलगर्जीपणा करणार्या सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटलांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा किंवा त्यांचे भत्ते बंद करण्याचा कडक इशारा दिला आहे.
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ नुसार राज्यात विनापरवाना दारू तयार करणे, दारूची भट्टी चालविणे किंवा अवैध दारू बाळगणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास ५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड आणि तीन महिन्यांपासून ते तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. असे असतानाही अनेकदा सरकारी मालकीचे ओढे, नाले, नदीकिनारे, गायरान जमिनी किंवा वन विभागाच्या हद्दीत चोरट्या मार्गाने हातभट्ट्या सुरू असल्याचे समोर येते. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने के लेल्या पत्रव्यवहारानंतर शासनाने सर्व विभागांना संयुक्तरित्या कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.www.konkantoday.com



