
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह स्थलांतरित करण्याचा प्रयत्न, दोषींवर कारवाई केली जाणार
समाजकल्याण विभागाच्या खेर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात विद्यार्थी नसल्याची खोटी माहिती देत प्रशासनाकडून हे वसतिगृह स्थलांतरीत करण्याचे सुरु असलेले काम विविध संघटनेच्या लोकप्रतिनिधींनी रोखले होते. या वसतिगृहात भेडसावणार्या प्रश्नासंदर्भात मंगळवारी समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त किशोर बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. संघटनेच्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाची चुका निदर्शनात आणून दिल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची ग्वाही अधिकार्यांनी दिली. अखेर वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन तसेच ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खेर्डी येथे अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे हे शासकीय वसतिगृह अनेक विद्याथ्यर्थ्यांना आधार बनले आहे. कित्येक वर्षे एका भाड्याच्या इमारतीत असलेल्या या वसतिगृहाची देखभालसह भेडसावणारे प्रश्न मार्गी लावावेत याबाबत अनेकदा समाज कल्याण विभागाला विविध संघटनांकडून निवेदन देण्यात आली. मात्र या प्रश्नी समाजकल्याण विभागाच्या अधिकार्यांनी पुरेसे लक्ष दिलेले नाही. एकीकडे विविध प्रश्न भेडसावत असताना अशा स्थितीत वसतिगृहात विद्यार्था नसल्याची खोटी माहिती देत हे वसतिगृह स्थालांतरित करण्याचा घाट घातला होता. याबाबत विविध संघटनेच्या लोकप्रतिनिधींनी वसतिगृहाठिकाणी धाव घेत हे स्थलांतर रोखत याबाबत जाब प्रशासना विचारला.www.konkantoday.com




