महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या उपाध्यक्षपदी चिपळूणचे उमेश सकपाळ


चिपळूण येथील नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या उपाध्यक्ष (कोकण विभाग) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रातील तब्बल ३९७नगराध्यक्षांमधून त्यांची निवड झाल्याने चिपळूण शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न प्रभावीपणे शासन दरबारी मांडण्यासाठी तसेच नगर परिषद आणि नगर पंचायतींमधील समन्वय वाढविण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाने ही नियुक्ती जाहीर केली. सामाजिक, संघटनात्मक आणि लोकाभिमुख कार्यातील त्यांच्या सक्रिय सहभागाची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button