पहिल्यांदा नोकरी मिळालेल्या युवकांना थेट त्यांच्या बँक खात्यात १५,००० रुपयांपर्यंतची रक्कम जमा होणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवार, १९ जून रोजी ‘प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना’ (PM-VBRY) अंतर्गत मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य वितरित करणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा नोकरी मिळालेल्या युवकांना थेट त्यांच्या बँक खात्यात १५,००० रुपयांपर्यंतची रक्कम जमा होणार आहे.या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी नवी दिल्लीत विशेष समारंभाचे आयोजन करून योजनेच्या काही लाभार्थ्यांशी थेट संवाद साधतील. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली. एकूण २,४०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान १५ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.

योजनेचे लाभ कोणाला मिळणार?

या योजनेद्वारे नवीन कर्मचाऱ्यांसोबत त्यांना रोजगार देणाऱ्या नियोक्त्यांनाही आर्थिक प्रोत्साहन दिले जात आहे. पहिल्यांदा नोकरीत प्रवेश करणाऱ्या युवकांना १५,००० रुपयांपर्यंत एकरकमी लाभ मिळेल. तर नवीन कर्मचारी नेमणूक करणाऱ्या कंपन्या किंवा मालकांना प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यामागे दरमहा ३,००० रुपयांपर्यंतचे सहाय्य मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button