
पर्यटकांच्या अतीउत्साहामुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले सावणे समुद्राच्या पाण्यात बुडाली कार
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील सावणे समुद्र किनार्यावर भटकंती करिता आलेल्या पुणे येथील पर्यटकांचा अतिउत्साहीपणा त्यांना चांगलाच नडला. त्यांची एसयुव्ही कार त्यांनी मौज मस्तीकरिता समुद्राच्या पाण्यात घातली आणि कार समुद्राच्या पाण्यात बुडाली.
दापोली येथील स्वच्छ, सुंदर किनारपट्टीची भुरळ अनेकांना पडते. ज्यांना समुद्राचे दर्शन होत नाही असे लोक पर्यटनासाठी दापोली तालुक्यातील समुद्र किनार्यावर येत असतात. तसेच सध्या उष्णतेच्या उकाड्याने त्रस्त झालेले अनेकजण दापोलीतील समुद्र किनार्यावर भटकंतीसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले आहेत.
समुद्रकिनार्याचे आकर्षण असलेल्या पुणे येथून आलेल्या पर्यटकांना त्यांचा अतिउत्साह नडला. त्यांनी आणलेली एसयुव्ही कार आंजर्ले येथील सावणे किनार्यावरील समुद्राच्या पाण्यात मौज मजेसाठी घातली खरी मात्र कार समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.www.konkantoday.com




