
जागतिक सायकल दिनानिमित्त रत्नागिरीत तटरक्षक दलाकडून ’संडेज ऑन सायकल’ रॅली
जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून भारतीय तटरक्षक दल अवस्थानतर्फे ५ किमी अंतराच्या संडेज ऑन सायकल सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या देशव्यापी मोहिमेला प्रतिसाद देत, तटरक्षक दल मुख्यालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हा उपक्रम राबवण्यात आला.
रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी परिसरात स्थित भारतीय तटरक्षक अवस्थानच्या आवारातून ङङकमांडिंग ऑफिसर यांनी या विशेष सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. सकाळी सुरू झालेली ही रँ ली यशस्वीरीत्या संपन्न झाली. या मोहिमेमध्ये तटरक्षक दलाचे जवान, अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय मिळून एकूण २५ सायकलपटूंनी उत्साहाने सहभाग घेतला. हा ५ किलोमीटरचा मार्ग तटरक्षक अवस्थानपासून सुरू होऊन, फिनोलेक्स कॉलेज (इग्हदर्ते ण्दत्तुा) मार्गे पुढे पाटीलवाडीपर्यंत गेला आणि तेथून पुन्हा मूळ केंद्रावर येऊन त्याची सांगता झाली.
कर्मचार्यांना आणि त्यांच्या अशा उपक्रमांचा बनवण्यासाठी आणि कुटुंबियांना भाग स्थानिक नागरिकांमध्ये आरोग्य व तंदुरुस्तीविषयी जनजागृती करण्यासाठी तटरक्षक अवस्थान नेहमीच राष्ट्रीय मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असते.www.konkantoday.com




