खेड-दापोली मार्गावरील साखरोली येथे मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ; पोलिस तपास सुरू


खेड-दापोली मार्गावरील साखरोली गावाच्या हद्दीत मानवी हाडांचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी (२१ जून) सायंकाळी सुमारे ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान साखरोली पेट्रोल पंपाजवळील वळणावर हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून सापडलेले मानवी अवशेष ताब्यात घेतले आणि आवश्यक पंचनामा केला. त्यानंतर पुढील तपासणीसाठी हे अवशेष कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, अवशेषांची ओळख अद्याप पटलेली नसून ते स्त्रीचे आहेत की पुरुषाचे, याबाबतही स्पष्टता आलेली नाही. तसेच मृत्यूचे नेमके कारण आणि या प्रकरणामागे कोणता गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार आहे का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या घटनेमुळे साखरोली व परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे. अधिकृत वैद्यकीय अहवालानंतर या प्रकरणाबाबत अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button