कोकण मार्गावर पावसाळी वेळापत्रकामुळे रेल्वेगाड्यांचा वेग १५ जूनपासून मंदावणार


कोकण मार्गावर पावसाळी वेळापत्रकाची यंदाही १० जूनऐवजी १५ जूनपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे २० ऑक्टोबरपर्यंत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावणार असून प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागणार आहे.
पावसाळ्यात उदभवणार्‍या आपत्कालीन परिस्थतीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी, वेर्णा, मडगाव, कारवार, उडुपी येथे वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार आहेत. आव्हानात्मक हवामानाच्या काळात सुरक्षितता सुनिश्चित करण्याकरिता विभागीय वेग समायोजित केला जाणार आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर रेल्वेगाड्या ताशी ४० कि.मी.च्या वेगाने हाकण्याच्या सूचना लोकोपायलटना करण्यात आल्या आहेत. २० ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसारच रेल्वेगाड्या धावणार आहेत. रोहा ते ठोकूरपर्यंत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावणार असल्याने प्रवाशांच्या पदरी विलंबाचा प्रवास पडणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button