
हिंदुत्वाचा भगवा घराघरात पोहोचवा -संभाजी भिडे
भगवा देशाचा प्राण आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा हा भगवा घराघरात पोहोचवा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कार्यकर्त्यांना केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चिपळूण विभागाच्यावतीने शुक्रवारी शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी १५व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत त्यांनी २८९ लहान-मोठ्या लढाया केल्या. शिवाजी महाराज पराक्रमी होते. हाच वारसा पुढे चालवताना संभाजीराजांनी १३४ लढाया केल्या. त्यामुळे या पिता-पुत्रांचे पराक्रम पाहता शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज प्रत्येकाच्या रक्तात भिनले पाहिजेत, असा सल्लाही भिडे यांनी दिला.
हिंदुत्वाचा भगवा घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी आता आपल्यावर आली आहे. ती पार पाडताना. प्रत्येकाने पायाला चाके लावून काम करण्याची गरज आहे. हिंदुत्व दुसर्यांना सांगण्यापूर्वी आपण शिवचरित्र, रामायण, महाभारत वाचले पाहिजे तसेच आपण सर्वांनी वारकरी झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
www.konkantoday.com




