सुट्टीच्या हंगामामुळे कोकण रेल्वे गाड्या धावताहेत विक्रमी गर्दीने


उन्हाळी स्पेशलसह नियमित रेल्वेगाड्या विक्रमी गर्दीन धावत आहेत. रेल्वेगाड्यांमध्ये ’एन्ट्री मिळवताना प्रवाशांची दमछाक होत आहे. लटकंतीचा प्रवास करत कोकणवासियांना गाव गाठावे लागत आहे. एकीकडे हाऊसफुल्ल धावणार्‍या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची ओढाताण सुरू असताना दुसरीकडे बिघडलेल्या वेळापत्रकाचा ही फटका बसत आहे. मंगळवारी १३ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
उन्हाळी सुट्टीमुळे कोकणवासियांची पावले गावाकडे वळत आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्टी हंगामासाठी अवघ्या ५ उन्हाळी स्पेशल गाड्या चालवत प्रवाशांना काहीअंशी दिलासा दिला असला तरी अपुर्‍या उन्हाळी स्पेशलमुळे कोकणवासियांना गाव गाठताना यातायात करावी लागत आहे. यंदा प्रथमच कोकणवासियांच्या दिमतीला दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल असल्याने गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button