
संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रूक प्रिदिवाडी येथे जावयाने मारला सासरच्या दागिन्यांवर डल्ला.
संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रूक प्रिदिवाडी येथील एका घरातील सोन्याच्या दागिन्यांची दोन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. सोन्याच्या दागिन्यावर जावयाने डल्ला मारल्याचे पोलीस तपासात सोमवारी उघड झाले. याप्रकरणी देवरुख येथील सचिन दत्तात्रय नाखरेकर याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवे बुद्रुक येथील रहिवासी संतोष दौलत पाल्ये यांच्या घरातून बंद कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना २४ जानेवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत घडली होती. सोन्याचा हार आणि सोनसाखळी अज्ञाताने लंपास केली होती. अज्ञात चोरट्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाल्ये यांचा संशय जावयावर होता. अखेर तो सोमवारी खरा ठरला. जावई सचिन याने हे दोगिने एका बँकेत ठेवल्याचे तपासात उघेड़ झाले. पोलिसांच्या तपासादरम्याने बँकेत ठेवलेल्या दागिन्यांची सोमवारी पाहणी करण्यात आली. हे दागिने आपले असल्याचे पाल्ये यांनी नमूद केले. याचवेळी हे दागिने जावयाने चोरल्याचे सिद्धझाले. सचिनवर गुन्हा दाखल करून त्याला सोमवारी रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.www.konkantoday.com




