
’वंदे भारत च्या अतिरिक्त डब्यांच्या मागणीकडे कानाडोळा, रेल्वे प्रवाशांच्यात नाराजी
देशभरातील जादा मागणी असलेल्या विविध मार्गावरील सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये रेल्वे बोर्डाने वाढ केली आहे. कोकण मार्गावरून धावणार्या सीएसएमटी-मडगाव सुपरफास्ट बंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्यास
रेल्वे प्रशासन नकारघंटा वाजवत आहे. या आलिशान एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्याची मागणी असतानाही दुर्लक्ष केले जात असल्याचा सूर आळवण्यात येत आहे. एक्स्प्रेसच्या डब्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. कोकण मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस कोकणवासियांच्या पसंतीस उतरली आहे. ८ डब्यांची एक्स्प्रेस १६ डब्यांची चालवण्यात यावी, अशी सातत्याने मागणी करण्यात येत आहे. राज्यातील बंदे भारत एक्स्प्रेसना अतिरिक्त डबे वाढवण्यात आले आहेत. मात्र कोकणात धावणाच्या वंदे भारतला डबे वाढवण्याची तसदी रेल्वे प्रशासनाने घेतलेली नाही. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
www.konkantoday.com




