लांजा तालुक्यातील देवधे मणचेकरवाडी येथे गव्यांच्या कळपाचा धुमाकूळ


लांजा तालुक्यातील देवधे मणचेकरवाडी येथे गवा (गव्यांचा) वाढता वावर शेतकर्‍यांसाठी गंभीर समस्या बनला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गव्यांच्या कळपाने परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला असून, आंबा आणि काजू बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन हंगामातच ही हानी झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.
स्थानिक शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार ८ ते १० गव्यांचा कळप सतत शेतांमध्ये फिरताना दिसत आहे. या गव्यांनी आतापर्यंत सुमारे २० ते २५ आंबा आणि काजूच्या झाडांची नासधूस केली असून काही झाडांची फांदी मोडून टाकली आहे, तर काही झाडांची मुळेच उखडली गेली आहेत. यामुळे केवळ चालू हंगामाचे नव्हे, तर पुढील काही वर्षांच्या उत्पन्नावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button