रूग्णांच्या सुविधेसाठी सरकारी आरोग्य व्यवस्था टिकवायला हवी -डॉ. अभय शुक्ला


मोठ्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांवरील हिंसेचे प्रमाण वाढत आहे. याला वैद्यकीय व्यवसायातील वाढते बाजारीकरण जबाबदार आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये परकीय गुंतवणूक वाढत आहे. या वाढत्या बाजारीकरणाचा परिणाम फक्त रुग्णालय किंवा रुग्णांवर होत नसून त्याचा विपरीत परिणाम पूर्ण समाजावर होत आहे. त्यामुळे लहान खासगी रुग्णालये, सरकारी आरोग्य व्यवस्था टिकवावी लागेल असे मत आरोग्य तज्ज्ञ डॉ. अभय शुक्ला यांनी व्यक्त केले.
चिपळूण सिटीझन डॉक्टर फोरमने नगर परिषद, शासकीय – आरोग्य विभाग, खासगी डॉ वक्टर संघटना, अनुसंधान ट्रस्ट साथी व रुग्ण हक्क समिती यांच्या सहकार्याने ’हिंसा आणि बाजारीकरणाच्या पलीकडे डॉ क्टर-रुग्ण सुसंवादाची दिशा या विषयावर नुकतेच शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत बोलत होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button