रत्नागिरी तालुक्यातील देऊड चाटवळवाडी येथे घरफोडी करणार्‍या संशयितावर गुन्हा


रत्नागिरी तालुक्यातील देऊड चाटवळवाडी येथे घरफोडी करून पैसे चोरुन नेणार्‍या संशयितावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची घटना मंगळवारी रात्री २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. अनंत बाळू गोणबरे (५५, रा. चाटवळवाडी, देऊड, रत्नागिरी) यांच्या घरी ही चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी संशयित सिद्धेश पांडुरंग आंबेरकर (३०, रा. खारवीवाडा, पूर्णगड ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिद्धेश याने २८ एप्रिल रोजी पहाटे २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास देऊड चाटवळवाडी येथील अनंत गोनबरे यांच्या बाथरुमची खिडकी उचकटून घरामध्ये प्रवेश केला होता. यावेळी सिद्धेश याने स्वयंपाक खोलीच्या कपाटात ठेवलेले २ हजार ५०० रुपये चोरुन नेले. अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button