रत्नागिरीतील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलचा (शहर) दहावीचा निकाल १०० टक्के

रत्नागिरी : शहरातील इंग्रजी माध्यमाच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल रत्नागिरी शहर या शाळेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून गेल्या अनेक वर्षांची उज्वल यशाची परंपरा शाळेने कायम राखली आहे.

या परीक्षेसाठी शाळेतून १३० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७० विद्यार्थ्यांना गुणवत्ता श्रेणी, ४५ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, १४ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर एका विद्यार्थ्याला तृतीय श्रेणी प्राप्त झाली आहे.

शाळेच्या उज्ज्वल यशात मानाचा तुरा खोवत सृष्टी किरण होतेकर हिने ९६ टक्के गुणांसह शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला. मिहीर नवनीत काणेकर ९५.८० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर हर्ष विनय जांगळे ९५.२० टक्के गुण मिळवून तृतीय आला.

शालेय प्रशासन, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि कर्मचारी वर्गाचे तसेच विद्यार्थ्यांच्या मेहनतीला पाठिंबा देणाऱ्या पालकांचे आणि ज्ञात अज्ञात अशा सर्व योगदान देणाऱ्या व्यक्तींचे शालेय प्रशासनाकडून आभार मानण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button