
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये. कोणतीही अडचण, तक्रार किंवा संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ डायल 112, रत्नसेतू चॅटबॉट (9371415612) किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये व त्या पुढे पाठवू नयेत. जिल्ह्यात शांतता, सलोखा व कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.



